*कोंकण एक्सप्रेस*
*न्हावेलीतील शिरोडा मेन रस्ता ते चौकेकर वाडी व शिरोडा मेन रस्ता ते निर्गुण वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी न्हावेली गावातील शिरोडा मेन रस्ता ते चौकेकर वाडी व शिरोडा मेन रस्ता ते निर्गुण वाडी .या कामांसाठी जनसुविधा 2023 – 24 मधून दहा लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला त्या रस्त्याचे भूमीपूजन सोहळ्यास
मा . श्री . महेश सारंग संचालक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ,सरचिटणीस सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा व भाजपा बांदा मंडल अध्यक्ष मा .श्री .महेश धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या वेळी गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच श्री अष्टविनायक सुधाकर धाऊसकर ,व माजी सरपंच प्रातिभा गावडे मॅडम, माजी उपसरपंच श्री संतोष नाईक, भाजप शक्ती केंद्रप्रमुख अजित चौकेकर , बुथ अध्यक्ष गावातील मानकरी मंडळी ग्रामपंचायत सदस्य ,भाजप कार्यकर्ते, व ग्रामस्थ ,यांच्या उपस्थितीत पार पडला.