*कोंकण एक्सप्रेस*
*डाक विभागामध्ये 21413 जागांसाठी होणार नोकरभरती*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
भारतीय पोस्ट खात्यामध्ये आता बंपर नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी ही नोकरभरती आहे. पात्र उमेदवार ज्यांना Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevaks पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांना पोस्टाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. India Post ची अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in वर डिरेक्ट लिंकच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या नोकरभरतीच्या माध्यमातून 21,413 जागांसाठी नोकरभरती होणार आहे.
डाक विभागात नोकरभरतीसाठी 10 फेब्रुवारी पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 3 मार्च 2025 पर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. तर अर्ज केल्यानंतर correction window ही 6 मार्चला उघडली जाईल. 8 मार्चला ती बंद होणार आहे.पोस्ट खात्यामध्ये नोकरभरतीसाठी अर्ज करणाऱ्यांचे किमान शिक्षण 10 वी पास आवश्यक आहे. दहावीला त्यांनी गणित आणि इंग्रजी हे दोन विषय घेणं आवश्यक आहे. तर अर्ज करणाऱ्यांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. ग्राम डाक सेवकांना Time Related Continuity Allowance दिला जाईल. दरवर्षी तो 3% वाढतो. तर पगार Rs.12,000/- to Rs.29,380/ या रेंजमध्ये असणार आहे. ABPM/Dak Sevak चा पगार Rs. 10,000/- Rs.24,470 असणार आहे.