*कोंकण एक्सप्रेस*
*शिवजयंती सोहळ्या निमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव-धाकोरे यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, ब्रह्मांडनायक नाट्यप्रयोग, रक्तदान शिबिर यांचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
शिवजयंतीच्या निमित्ताने मागील वर्षीपासून शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव – धाकोरे च्या वतीने रक्तदान शिबिर तसेच इतर समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जातात. यावर्षी मुलांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता जि. प.केंद्रशाळा आजगाव नं. 1 ता. येथे करण्यात आले आहे. तसेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी 9:०० वा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, सायं.7:०० वा. सप्तरंग कला मंच होडावडा यांचे दोन अंकी ट्रीकसीन नाटक,”ब्रह्मांडनायक”.23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:०० ते दुपारी 1;०० “रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
तसेच दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव धाकोरे च्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे नियम:- ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी या दोन गटात घेण्यात येईल.या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमाच्या किंवा कोणत्याही जिल्हा परिषद ,माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.स्पर्धेचा विषय त्याच दिवशी दिला जाईल. (स्मरण चित्र ),प्रत्येक गटातून प्रत्येक शाळेतील जास्तीत जास्त पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.स्पर्धकांची नोंदणी शाळेमार्फत करावी.विद्यार्थ्यांना कागद मंडळामार्फत दिला जाईल.विद्यार्थ्यांनी आपले रंग साहित्य स्वतः आणावयाचे आहे.विद्यार्थ्यांना चित्र रंगवण्यासाठी कोणतेही रंग माध्यम वापरता येईल.दिलेल्या वेळेतच विद्यार्थ्यांनी चित्र काढायचे आहे आणि रंगवायचे आहे.चित्र काढताना कोणत्याही नमुना चित्राचा आधार घेता येणार नाही, म्हणजेच समोर एखादे चित्र घेऊन चित्र काढता येणार नाही.अर्धवट चित्र ग्राह्य धरले जाणार नाही.
आयोजकांचे नियम स्पर्धकांना बंधनकारक राहतील.परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे.
चित्रकला स्पर्धेतील आकर्षक बक्षीसे पुढील प्रमाणे:-गट क्र. 1 – इयत्ता पहिली ते चौथी,प्रथम क्रमांक- रोख रुपये 2000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह,द्वितीय क्रमांक – रोख रुपये 1500, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह,तृतीय क्रमांक – रोख रुपये 1000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह,उत्तेजनार्थ 1 – रोख रुपये 500 व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ 2 – रोख रुपये 500 व प्रमाणपत्र,गट क्र. 2 – इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक- रोख रुपये 2500, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक – रोख रुपये 2000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह
तृतीय क्रमांक – रोख रुपये 1500, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह उत्तेजनार्थ 1 – रोख रुपये 1000 व प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ 2 – रोख रुपये 500 व प्रमाणपत्र
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धा संपल्यानंतर अल्पोपहार दिला जाईल आणि लगेचच एक तासात बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाने केले आहे.
स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 15 फेब्रुवारी 2025 अशी असून पुढील नंबर वर स्पर्धकाने आपली नोंदणी करावी.
नाव नोंदणीसाठी तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक प्रतिक भगत- 7038443981/9421182412 प्रसाद मेस्त्री – +919421149362 ,कांबळी सर 9421631204 या नंबर वर संपर्क साधावा.