*कोंकण एक्सप्रेस*
*एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना संपूर्ण थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे व महामंडळाच्या नवीन कर्ज याजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीती आर. पटेल यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत मुदती कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनांतर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर (०२३६२ – २२८१८९) किंवा ८६६८८९८९५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती देण्यात आली आहे.