कुडाळात ठाकरे शिवसेनेला,काँग्रेसला धक्का : महाविकास आघाडीतील सात नगरसेवक भाजपमध्ये दाखल

कुडाळात ठाकरे शिवसेनेला,काँग्रेसला धक्का : महाविकास आघाडीतील सात नगरसेवक भाजपमध्ये दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळात ठाकरे शिवसेनेला,काँग्रेसला धक्का : महाविकास आघाडीतील सात नगरसेवक भाजपमध्ये दाखल*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळमध्ये महविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या (उबाठा) ५ तर काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानावा लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून देश व राज्याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदलू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी कुडाळच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्या होत्या. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. सई काळप, नगरसेविका सौ. ज्योती जळवी, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे व काँग्रेसच्या नगरसेविका सौ. अफ्रिन करोल, नगरसेविका सौ. अक्षता खटावकर या नगरसेवक यांनी आज महायुतीत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीकडे केवळ एकच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात मविआला हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!