*कोकण Express*
*फोंडाघाट येथे कोरोना लसीकरण कक्ष सेवेत…!*
*कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांचे हस्ते कक्षाचा शुभारंभ…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना लसीकरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अन् ग्रामीण भागात विकासाच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करणाऱ्या फोंडाघाट पंचक्रोशीतील लसीकरण कक्षाचे उद्घाटन कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी तसेच जेष्ठ नागरिक आबु पटेल यांनी श्रीफळ वाढवले. यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन जंगम, डॉक्टर टिकले, ज्येष्ठ ग्रामस्थ अाबू पटेल, सहाय्यक सहकारी उदय बुचडे,प्रसाद मांजरेकर, अविनाश धुमाळे, अमोल केंद्रे, मंदा राणे, सेजल कदम, कविता देवरुखकर, वैभवी सावंत, सुनिता धुरे, संचिता जाधव आणि सर्व आरोग्य सेवक- सेविका- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जंगम यांनी सोमवार- बुधवार- शुक्रवार या दिवशी करोना लसीकरण कक्षप्रा.आ.केंद्र येथे सुरू राहील असे सांगितले. ६०वर्षावरील तसेच गंभीर आजार असलेल्या ४५ते ६५ वयोगटातील रुग्णांना लसीकरण केले जाईल. यासाठी ॲप- द्वारे रजिस्ट्रेशन करता येईल. शासनाने कोव्हीशील्ड लस या ठिकाणी उपलब्ध केली आहे शासनाची सर्व नियमावली आणि सूचना पाळून हे लसीकरण केले जात आहे. याचा पंचक्रोशीतील संबंधितांनी लाभ घ्यावा. तसेच पुढील आठवड्याची रूपरेषा- नियोजन या आठवड्याच्या प्रतिसादावर अवलंबून राहील, त्यांनी सांगितले. यावेळी ६० वर्षावरील कोवीड लस लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.