*कोंकण एक्सप्रेस*
*आंगणेवाडी यात्रेत भाविकांची मोबाईल अभावी होते गैरसोय*
*बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी घेतली बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची भेट*
*मालवण : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते.हे टाळण्यासाठी माेबाईल बीएसएनएल टाॅवरची काेलमडणारी व्यवस्था सुस्थितीत करण्यासाठी बीएसएनएल चे मालवणचे ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर सन्माननीय विलास गाेवेकर यांची भेट घेऊन यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली.
यावेळी कुडाळ-मालवण चे विधानसभा क्षेत्रप्रमुख सन्माननीय बबनजी शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर, पराग खाेत, हरी खवणेकर, दत्ताराम आळवे तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.