*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी खडकवाडी येथे एसटीच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील खडकवाडी येथे एसटी बसची धडक बसुन श्री विश्वनाथ (बबन) सावंत वय 56 वर्ष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वैभववाडी येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरस येथे हलविण्यात आले आहे.
सावंत आपल्या मोटर सायकल ने गावातच जात असताना खडकवाडी फाटा येथे एसटी बस ला धडक दिली सावंत यांना अंदाज आला नाही मोटर सायकल बस च्या खाली गेली तर सावंत यांचे डोके बसवर आपटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने येथील ओरस जिल्हा रुग्णालयात उपचार साठी हलविण्यात आले आहे. या बाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.