*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांच्या कडून स्नेहबंध इमारतीस देणगी*
*कणकवली : प्रतिनिधी*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्यु. कॉलेज कनेडी चे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य, हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारे माजी मुख्याध्यापक सन्मा.श्री. लोबो सर व त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रु.देणगी स्नेहबंध इमारत बांधकाम निधी भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी यांनी आजपर्यंत झालेल्या संपूर्ण शाळेच्या प्रगतीचे दर्शन घडवले त्यामध्ये माजी संस्थाचालक, माजी शिक्षक व मुख्याध्यापक यांचे योगदान अमुल्य आहे. मात्र भविष्यातील प्रगतीचा वेध घेण्यासाठी शाळेत अत्याधुनिक सोयी सुविधा व तंत्रज्ञान निर्माण करून शाळेची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक वाटचाल वृद्धिंगत करण्यासाठी नियोजित स्नेहबंध इमारत उभारली जाणार आहे त्याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई चे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीश सावंत, उपाध्यक्ष सन्मा.श्री. पी.डी. सावंत, सरचिटणीस सन्मा. श्री.शिवाजी सावंत, संचालक सन्मा. श्री.व्ही.बी सावंत, सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर.एच सावंत, शालेय समिती सदस्य सन्मा. श्री. बावतीस घोन्सालवीस, सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. प्रसाद मसुरकर सर यांनी केले.