बांदा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या स्वर्णिम भारत रथाचे स्वागत

बांदा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या स्वर्णिम भारत रथाचे स्वागत

*कोंकण एक्सप्रेस”

*बांदा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या स्वर्णिम भारत रथाचे स्वागत*

*बांदा : प्रतिनिधी*

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान यांच्या स्मर्णिम भारत यात्रेचे बांदा येथे स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग आणि गोवा असा दौरा करत असलेल्या या रथयात्रेचा 3 फेब्रुवारी रोजी दोडामार्ग तालुक्यातून आरंभ झाला.रविवारी बांदा येथील श्री विठ्ठल मंदिर च्या व्यापारी भुवन सभागृहामध्ये या अध्यात्मिक चित्ररथ यात्रेचे आगमन झाले.

अध्यात्मिक विकासासाठी राजयोगाचे प्रशिक्षण तसेच महाशिवरात्रीचे रहस्य व अन्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्यापारी भुवन येथे ब्रम्हाकुमारी संस्थेतर्फे बारा फुटी शिवलिंग तसेच बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली आहे.येणाऱ्या भाविकांना प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती दिली जात आहे तसेच राजयोग लेझर शो द्वारे राज्यविका बद्दल मार्गदर्शन केले जाते जात आहे.

हे प्रदर्शन रविवार दिनांक 9 आणि सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी असे दोन दिवस चालणार आहे.या माहिती प्रदर्शनाचे उद् घाटन बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर,श्री बांदेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत ,श्री विठ्ठल मंदिर सेवेकरी आशुतोष भांगले, लक्ष्मी सावंत, प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या गोवा तथा सिंधुदुर्ग प्रमुख शोभादीदी, सावंतवाडी सेवा केंद्राच्या कांचनदीदी, कुडाळ सेवा केंद्राच्या हर्षाबहन यांच्या हस्ते झाले.

यावेळी शोभादीदी यांनी कलियुगातील आजच्या स्थितीचे वर्णन करून स्वतःची उन्नती करून घ्यायची घ्यायची हीच वेळ आहे.आज विश्व परिवर्तनाची गरज आहे पण त्यासाठी त्याची सुरुवात स्वतःपासून करून राजयोग उपासनेद्वारे स्वपरिवर्तनातून सृष्टी परिवर्तन करावे.यासाठी मार्गदर्शनाचे कार्य प्रजापिता आम्हा कुमारी विश्वविद्यालय तर्फे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राजाराम सावंत,दत्तप्रसाद पावसकर आणि आशुतोष भागले यांनी आपल्या मनोगतातून या कार्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानभाई यांनी,स्वागत हर्षादीदी व स्वातीबहन यांनी तर आभार प्रदर्शन छाया माताजी यांनी केले.यावेळी भगवानभाई ,लवूभाई यांच्यासह ब्रह्मकुमारी चे सर्व सेवाधारी सदस्य उपस्थित होते. जास्तीत जास्त भाविकांनी या उपक्रमास भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!