पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र सुरू

पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र सुरू

*कोंकण एक्सप्रेस*

*पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र सुरू*

*ना. नितेशजी राणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांना फायदा*

*कणकवली : प्रतिनिधी*

पारंपरिक शिल्पकार आणि कारागीरांच्या मदतीसाठी केंद्र सरकारची योजना आहे. पीएम विश्वकर्मा ही माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांनी 23 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केली.पीएम विश्वकर्मा योजना सुरू झाल्यापासून त्यामध्ये काही तांत्रिक अडीअडचणींमुळे येथील प्रशिक्षण केंद्र होऊ शकले नाही परंतु सर्वांचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा कणकवली वैभववाडी देवगड चे आमदार श्री नितेशजी नारायण राणे साहेब यांच्या जवळ यासंदर्भात व्यथा मांडली असता त्यांनी पीएम विश्वकर्मा योजना प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले.पीएम विश्वकर्मा या योजनेमध्ये 18 पारंपारिक व्यवसायाचा सहभाग आहे. यामध्ये प्रथमतः पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सुतारकाम कार्पेंटर या व्यवसायाची नोंदणी केल्यावर लाभार्थ्यांची ओळख म्हणून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र याच्या सहाय्याने शिल्पकला आणि कारागिरांना त्यांची ओळख मिळते पीएम विश्वकर्मा योजना कारपेंटर प्रशिक्षणाचा शुभारंभ करताना उद्घाटक म्हणून लाभलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत साहेब तसेच कणकवलीचे माजी सभापती श्री. मनोज रावराणे, मराठे कृषी कॉलेज संस्थेचे अध्यक्ष श्री. दीपेशजी मराठे सर, ओरोस येथील पीएम विश्वकर्माची माहिती देण्यासाठी आलेले श्री. चिमणकर सर तसेच आयडीयल स्किल डेव्हलपमेंट चे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, सचिव प्रा.हरीभाऊ भिसे, पीएम विश्वकर्मा टेक्निकल सपोर्ट टीमचे श्रीकृष्ण पांडव सर तसेच प्रशिक्षण देण्यास आलेले ट्रेनर श्री महेश सुतार तसेच असे सर श्री सिद्धेश प्रभू खानोलकर सुमती मराठे कृषी तंत्रनिकेतन फोंडाघाट येथील प्राचार्य श्री. संत सर तसेच विद्या राणे मॅडम यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

कारपेंटर कारागिरांना 18 महिन्यासाठी पाच टक्के वार्षिक व्याज दराने पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये पर्यंत आणि 36 महिन्यासाठी पाच टक्के वार्षिक व्याज दराने दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांची मदत मिळते या योजनेअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण हे दिले जाते यामध्ये प्रशिक्षण पाच दिवसाचे असून यामध्ये दर दिवसाला पाचशे रुपये दिले जातात तसेच पंधरा हजार रुपयापर्यंत टुलकीटचा फायदा मिळतो डिजिटल व्यवहारासाठी इन्सेंटिव्ह आणि मार्केटिंग सहाय्यक दिले जाते. पहिल्या बॅचचे पी एम विश्वकर्मा प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील श्रीमती सुमती मराठे कृषी तंत्रनिकेतन फोंडाघाट येथे दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 मध्ये वेळेत पूर्ण झाले असून प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर म्हणून श्री.महेश सुतार कुडाळ पावशी येथील त्यांनी प्रशिक्षण शिकवत असताना आधुनिक हत्यारांची तसेच इलेक्ट्रिक मशीन यांची माहिती करून दिली व आजच्या आधुनिक काळात या सर्व इलेक्ट्रिक हत्यारांचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले.

हे प्रशिक्षण सुरू असते वेळी लाभार्थी महेश मुकुंद मेस्त्री, देवदत्त दिगंबर मेस्त्री, संदीप सुरेश मेस्त्री, सुधीर महादेव सुतार, सतीश शिवराम मेस्त्री, मयूर मधुकर पांचाळ,नागेश सदाशिव मेस्त्री,प्रमोद प्रकाश मेस्त्री, संजय तुकाराम सुतार, गुरुनाथ रमेश मेस्त्री, आदिनाथ केशव मेस्त्री, अतुल मधुकर मेस्त्री, हे सर्व लाभार्थी कणकवली तालुक्यातील होते.

यामध्ये ज्यांचे योगदान लाभले ते मराठे कृषी संस्थेचे अध्यक्ष श्री. दीपेश मराठे सर व विद्या राणे मॅडम, प्रिन्सिपल श्री.संत सर तसेच श्री.कृष्णा पांडव सर या सर्वांनी सिंधुदुर्ग येथील श्रीमती सुमती मराठे कृषी तंत्रनिकेतन फोंडाघाट येथे प्रशिक्षण मिळवून दिले त्याबद्दल प्रशिक्षणार्थींनी सर्वांचे आभार मानले यानंतर या योजनेअंतर्गत मूर्तिकार, गवंडी, मासे जाळी विणकरी, सलून व्यावसायिक, टेलर याचे प्रशिक्षण देखील लवकरच सुरु केले जाणार आहे याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन आयडीयल स्किल डेव्हलपमेंट चे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सचिव प्रा.हरीभाऊ भिसे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!