*कोंकण एक्सप्रेस*
*उद्या निघणार दोडामार्ग ते पांडुरंग मंदिर झोळंबे पायी दिंडी*
*दोडामार्ग : शुभम गवस*
सालाबाद प्रमाणे माघी एकादशी निमित्त शुक्रवार दि.०७फेब्रुवारी रोजी माघ दशमी, शनिवार दी. ०८ फेब्रुवारी रोजी एकादशी तसेच रविवार दि.०९ फेब्रुवारी रोजी माघ दशमी दिवशी दुपारी काला, तदनंतर दिंडी व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.तरी सर्व भाविक भक्त मंडळींनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.
तसेच ज्या भाविक भक्तांना भजन किर्तन करून सद्गुरू चरणी आपली सेवा रुजू करावी तसेच उद्या ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता दोडामार्ग गणेश मंदिर ते झोळंबे पांडुरंग मंदिरापर्यंत पायी वारी निघणार आहे. यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दोडामार्ग तालुका वारकरी सांप्रदाय अध्यक्ष मदन कुंदेकर आणि श्री. पांडुरंग मंदिर अध्यक्ष प्रवीण गवस यांनी केले आहे.