*कोंकण एक्सप्रेस*
*व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण दोडामार्ग येथे संपन्न*
*डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, व सिंधू रत्न समृद्धी योजना अंतर्गत आयोजन*
*हळद लागवडीस योग्य जमीन आपल्या भागात असल्याने त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करा ; दीपक केसरकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्हयांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करुन या जिल्हयांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्हयांसाठी “सिंधुरत्न समृध्दी” ही पथदर्शी योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या ३ वर्षासाठी राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या सिंधू रत्न समृद्धी योजना अंतर्गत बुधवार दि-०५ फेब्रुवारी रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी व्यासपीठावर माजी शालेय शिक्षण मंत्री,सिंधू रत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर,डॉ.बा.सा.को.कृ.वि. दोपोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, मसाले मंडळ, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या सहाय्यक संचालिका डॉ. ममता धनकुडे, इसांते एग्री प्रा. ली चे विक्रम मेहता, दापोली विद्यापीठाचे प्रा. डॉ.अजय राणे, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, कसाई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर,गुरुदास सावंत,बबलू पांगम, दोडामार्ग महिला शिवसेना तालुका प्रमुख चेतना गडेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.