*कोंकण एक्सप्रेस*
*वाळूशिल्प साकारून गणेशाच्या प्रती अनोखी भक्ति अर्पण*
*प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चीपकर यांनी आरवली सोंन्सूरे येथे साकारले गणपतीचे सुंदर वाळूशिल्प !*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
गणपती बाप्पा म्हणजे आबालवृद्धांचे आराध्य दैवत ! आपल्या लाडक्या बाप्पाची भक्ति किंवा प्रेम कोण कक्ष पद्धतीने दाखवेल ही सांगता येत नाही . आज माघी गणेश जयंती निमित्त आरवली सोंन्सूरे येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चीपकर या कलाकाराने सुंदर असं दोन फूट उंचीचे गणपतीचे वाळूशिल्प साकारले आहे. हे वाळूशिल्प साकारून गणेशाच्या प्रती अनोखी भक्ति या कलाकाराने अर्पण केली.हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना सुमारे दोन तास लागले.त्यांनी साकारलेले गणपतीचे हे मनमोहक रूप सर्वांना आकर्षित करून घेत आहे.