*कोंकण एक्सप्रेस*
*रविवारी होणार एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा*
*सिंधुदुर्गनगरी : जि.मा.का.*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट –ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली या दोन उपकेंद्रवार घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी एकूण ७८९ उमेदवार परीक्षेस बसणार आहेत परीक्षीच बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे बैठक क्रमांक KD ००१००१ ते KD ००१४०८ आणि कणकवली कॉलेज कणकवली येथे बैठ क्रमांक KD ००२००१ ते KD ००२३८१ उपकेंद्रवर परीक्षा होणार आहे.
परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे , आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपायोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडुन नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्य कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.