*कोंकण एक्सप्रेस *
*सोनवडे शिवडाव आणि आंजिवडे घाटमार्गाच्या डीपीआर बनविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा*
*बांधकाम मंत्र्यांची आम. नीलेश राणेंनी घेतली भेट*
*मुंबई : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. शिवेंद्रराजे भोसले यांची आमदार नीलेश राणे यांनी मुंबई येथे भेट घेतली.यावेळी कुडाळ तालुक्यातील जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोटगे सोनवडे शिवडाव या घाटमार्गाचे काम सुरू करण्यासंदर्भात व माणगाव खोऱ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण अश्या आंजिवडे घाटमार्गाच्या डीपीआर बनविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
कुडाळ मालवण मतदारसंघाच्या विकास कामांचा बॅकलॉग मोठा आहे.मंत्री महोदयांनी त्यासाठी पण सकारात्मक आश्वासन दिले त्याबद्दल त्यांचे आभार माणल्याचे आम. नीलेश राणे यांनी सांगितले.