*कोंकण एक्सप्रेस*
*बहुचर्चित वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा ३१ जानेवरीला*
*कुडाळ : प्रतिनिधी*
खासदार मा. श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या शुभहस्ते आणि मा. पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, भाजपा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी बहुचर्चित वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.
२०१३ साली तात्कालीन पालकमंत्री नारायणराव राणेंच्या संकल्पनेतुन कर्ली खाडीवर पंतप्रधान सडक योजनेतून हा पूल प्रस्तावित करण्यात आला. त्या नंतरच्या काळात रखडलेला हा पूल आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले, अनेक समस्यांमवर तोडगा काढला, वेळोवेळी वराड पुलाच्या ठिकाणी भेट दिली आणि कित्येक वर्षे रखडलेल वराड पुलाच काम पूर्णत्वास नेल.
आज भव्य-दिव्य पूल वाहतुकीसाठी खुला होत आहे. हा पूल पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा पूल आहे.