*कोंकण एक्सप्रेस*
*कोकणचे बुलडोझर मंत्री नितेश राणे : रत्नागिरीत एकच चर्चा!!*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांच्या धडाकेबाज कामामुळे अगदी सरकारी कर्मचाऱ्यांपासून तर अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा की वीस वर्षात झालं नाही ते वीस दिवसात मंत्री नितेश राणे यांनी केलं.त्यामुळे मंत्री नितेश राणे यांना उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदिनाथ योगी यांच्याप्रमाणे आता “बुलडोझर बाबा” म्हणून प्रसिद्धी रत्नागिरी सारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांनी मंत्री नितेश राणे यांना चांगलं काम केल्याचे म्हटलं आहे.त्याचबरोबर आता मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदना चे फलक हे रत्नागिरीत झळकत आहेत त्याने एकच खळबळ माजली आहे.
मस्य विभागाचे मंत्रीपद घेतल्यावर मंत्री नितेश राणे यांनी बंदर विभागाकडे नजर फिरवली आणि सगळ्यात जास्त कोकणातील जिल्ह्यात अनाधिकृत बांधकाम रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदरात झालेले आहे.आणि याचा पूर्ण अभ्यास करून मंत्री नितेश राणे यांनी ठोस पावले उचलली आणि संबंधित अधिकाऱ्यांना संधी दिली की तुम्ही स्वतःहून काही कार्यवाही करा मला कुठल्याही परिस्थितीत पुढच्या मीटिंगमध्ये ज्यावेळी मी तीन महिन्यांनी मीटिंग घेईन त्यावेळी मला पुढच्या मीटिंगमध्ये याचा सगळा लेखाजोखा दिला पाहिजे.
त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या कामाची तारीफ तर काही सरकारी कर्मचारी कस्टम सारख्या विभागातील कर्मचारी करत आहेत.कारण कस्टम च्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमची ही जागा तिथे होती परंतु कोणीच तिथे हात घालत नसल्यामुळे आम्हालाही त्रास होत होता.देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ते मंत्री नितेश राणे यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.त्याच प्रमाणे मंत्री नितेश राणेना यांना अभिनंदनही सांगा अशाही अभिनंदना चे फोन किंवा मेसेज लोकांपर्यंत पोहोचू लागले आहेत गेली.मंत्री नितेश राणे याच्या धडाकेबाज कारवाई मुळे अनेक लोकांनी अभिनंदन केले आहे.दरम्यान मिरकरवाडा प्रमाणे समुद्र किनारी असलेली सगळीच अनधिकृत बांधकामे हटवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहेत.