मळेवाड येथे १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

मळेवाड येथे १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*मळेवाड येथे १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

मळेवाड जकात नाका येथील गणेश मंदिरात श्री गणेश मित्रमंडळ आयोजित शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी सकाळी ८:०० ते दु. १: ०० वा.गणहोम विधान अनुष्ठान व धार्मिक विधी, श्रींच्या मूर्तीवर अभिषेक ,आरती, गाऱ्हाणी , दु.१:०० ते ३:०० महाप्रसाद,दु ३:०० ते ५:०० फुगडी, भजने सायं.७:०० वा. भावई पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ,धामापूर यांचा महान पौराणिक “ब्रह्माक्ष उद्धार” हा नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गणेश मित्रमंडळ,मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!