*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले रामेश्वर मंदिरात उद्यापासून माघी गणेश जयंती*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
वेंगुर्ले शहरातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत माघी गणेश जयंती उत्सव व परिवार देवतांचे वर्धापनदिन उत्सव साजरे होणार आहेत. त्यानिमित्त ३० रोजी उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वरावर लघुरुद्र व अभिषेक, ३१ रोजी शनिदेव वर्धापनदिन, श्री सत्यनारायणाची महापूजा, नवचंडी देवता स्थापना व पाठवाचन, १ फेब्रुवारी रोजी श्री नागेश्वर वर्धापनदिन, वरदशंकर व्रतपूजा, श्री गणेश जयंती, २१ गणपतींची स्थापना व २१ गणेशयाग (हवन) पूर्णाहुतीसह, सायंकाळी ४ पासून हळदीकुंकू, २ रोजी श्री भगवती वर्धापनदिन, नवचंडी हवनयुक्त, सकाळी १० वाजल्यापासून कुंकूमार्चन, सायंकाळी ५ वाजता गणपती विसर्जन, ३ रोजी १२ वाजता बारापाच देवतांस महानैवेद्य, आरती, गाहाणे व सर्व लोकांस महाप्रसाद. उत्सव कालावधीत रात्री ७ वाजता तरंगदेवता व गणपती-भगवती, नागनाथ-दत्त यांची भजनासह पालखी प्रदक्षिणा होणार आहे.