निगुडे सोनुर्ली मुख्य रस्त्याचे २०० मीटरचे काम पूर्ण

निगुडे सोनुर्ली मुख्य रस्त्याचे २०० मीटरचे काम पूर्ण

*कोंकण एक्सप्रेस*

*निगुडे सोनुर्ली मुख्य रस्त्याचे २०० मीटरचे काम पूर्ण*

*माजी उपसरपंच गुरदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले, सोनुर्ली, निगुडे, निरवडे रस्ता प्रतिमा ५/५०० ते ७/५०० मधील २०० मीटर अपूर्ण राहिलेला रस्ता पूर्ण करण्यात आला निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार यासंदर्भात विचारणा केली होती त्याचा पाठपुरावा करत सदर रस्ता २६ जानेवारी पूर्वी पूर्ण करा असे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री. वैभव सरगरे यांना दिले व सदर रस्त्यावर पडलेले खड्डे निगुडे सोनुर्ली मुख्य मार्गावर तात्काळ बुजवा अशी मागणी केली होती याची दखल घेऊन सदरचा रस्ता दिनांक २४ जानेवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत २०० मीटर डांबरीकरण व खड्डे पडलेले बुजवण्यात आले.

निगुडे श्री देवी माऊली पुन प्रतिष्ठापन कार्यक्रम असल्यामुळे भाविक भक्तगण गावामध्ये मोठ्या प्रमाणात येणार असून ठीक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी चालवणे कठीण होते.त्यामुळे सदर रस्ता लवकर होणे गरजेचे होते मे २०२४ रोजी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते.परंतु तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका जाधव यांच्याकडे २०० मीटर रस्त्यासाठी गुरुदास गवंडे यांनी अतिरिक्त आराखडा मध्ये तरतूद करण्यासाठी मागणी केली होती.

त्यामुळे सदर रस्ता व मोरी त्या ठिकाणी पूर्णता नवीन करण्यात आले.रस्त्याचं काम अजून अपूर्ण आहे पुन्हा रस्त्यावर डांबरीकरणाचा थर येणार आहे.त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सदर रस्ता वाहने जाण्याकरता करण्यात आलेला आहे उर्वरित रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.तसेच निगुडे तिठा या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत आहेत. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे रंबलर पट्टे व दिशादर्शक फलकाची मागणी श्री गवंडे यांनी उपअभियंता श्री सरगरे यांच्याकडे केले सदर रस्त्याचे काम व खड्डे बुजवल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!