सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला किडनी डायलिसिस युनिट व आर ओ प्लांटसाठी निधी प्राप्त

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला किडनी डायलिसिस युनिट व आर ओ प्लांटसाठी निधी प्राप्त

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला किडनी डायलिसिस युनिट व आर ओ प्लांटसाठी निधी प्राप्त*

*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी रुग्णांच्या वतीने मानले आभार*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला किडनी डायलिसिस युनिट व आर ओ प्लांट याकरिता पंधरा लाखाची तातडीने निधी आवश्यकता असल्याने माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर *तसेच शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोकराव दळवी यांनी मोलाचे सहकार्य करून निधी प्राप्त करून दिल्याबद्दल जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी रुग्णांच्या वतीने धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे किडनी डायलिसिस युनिट तसेच डायलिसिस युनिट साठी लागणारे आर ओ प्लांट यासाठी 15 लाख रुपयाची निधी आवश्यक असल्याने यासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत तातडीने निधी दिल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर गिरीश चौगुले तसेच सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी माननीय माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर तसेच शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक दळवी यांचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मार्फत तसेच सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या तालुक्याच्या डायलिसिस साठी येणारे रुग्ण यांच्यावतीने धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.

ही पंधरा लाखाची निधी तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यकता असल्याने या तीनही तालुक्यातील रुग्ण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस साठी आठवड्यातून दोन वेळा रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार डायलेसिस युनिट शासनामार्फत रुग्णांना सेवा देत होती त्यापैकी दोन युनिट बंद पडलेले होते.गेली दहा वर्षे होऊन त्यातील काही युनिट गॅरेंटी पिरेड संपल्याने मशनरी दुरुस्त करणे टेक्निशनला शक्य नसताना त्यातील एक डायलिसिस तातडीने त्या युनिटचा एक स्पेअर पार्ट घालून दुरुस्त झाल्याने जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याशी मोबाईल द्वारे फोन करून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी पाठपुरावा करून तातडीने तो स्पेअर पार्ट मशीनरीला घालून ते चालू केले होते.

त्यानंतर एक डायलिसिस युनिट पूर्णपणे बंद पडल्यामुळे गॅरंटी पिरेड संपल्यामुळे किडनी डायलिसिस युनिट साठी दहा लाख रुपयांची निधी आवश्यकता होती त्याचप्रमाणे डायलिसिस युनिटसाठी लागणारे आर ओ प्लांट म्हणजेच चार डायलिसिस युनिट साठी लागणारे वॉटर फिल्टर आर ओ प्लांट याची सुद्धा दहा वर्षे या प्लांट सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सेवा देत होता परंतु तो आर ओ प्लांट चे गॅरंटी पिरेड संपल्याने तो मध्ये मध्ये बिघडत होता.यासाठी नव्याने हे युनिट बसवण्यासाठी पाच लाख रुपयाची निधी उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यकता होती यासाठी सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यातील रुग्ण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये किडनी डायलिसिस करण्यासाठी येत असतात आर ओ प्लांट पूर्णपणे बंद पडला तर चारही डायलिसिस युनिट रुग्णांना किडनी डायलिसिसची सेवा रुग्णांना देऊ शकत नाही.

यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अशोकराव दळवी यांना सर्व बाबीची कल्पना देऊन माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांच्यामार्फत आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत १५  लाखाची निधी तातडीने आवश्यकता असल्याने ही निधी मिळण्यासाठी शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दळवी यांना आपण पाठपुरावा कवळ.जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सविस्तर बोलणी करून ही पंधरा लाखाची निधी तातडीने माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांच्यामार्फत मंजुरी मिळण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्यामुळे त्यांचे तिन्ही तालुक्यातील रुग्णांच्या वतीने व किडनी डायलिसिस यंत्रणा पूर्णपणे बंद पडल्यास साधारणपणे दरमहा खाजगीरित्या १२००० रुपये एका रुग्णास एक डायलिसिस खाजगीरित्या रुग्णालयात करण्यासाठी पंधराशे रुपये म्हणजेच महिन्यातून आठ वेळा रुग्णांना उपचार घेण्यासाठी. पडणार होते.

तसेच गोरगरीब रुग्णांना खाजगीरित्या डायलिसिस करणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला तातडीने निधी प्राप्त करून दिल्यामुळे माननीय माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई तसेच शिंदे सेनेचे माननीय श्री अशोकराव दळवी यांचे आभार व धन्यवाद देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले जनरल सर्जन व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!