तारकर्ली स्वामी समर्थ मठाचा २० वा वर्धापन दिन सोहळा २, ३ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांनी साजरा होणार

तारकर्ली स्वामी समर्थ मठाचा २० वा वर्धापन दिन सोहळा २, ३ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांनी साजरा होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*तारकर्ली स्वामी समर्थ मठाचा २० वा वर्धापन दिन सोहळा २, ३ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांनी साजरा होणार*

*मालवण : प्रतिनिधी*

तारकर्ली येथील श्री स्वामी समर्थ मठाचा २० वा वर्धापन दिन सोहळा व श्री स्वामी समर्थ पालखी पादुका अक्कलकोट येथून तारकर्ली येथे येत आहेत.यानिमित्त श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा २ व ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता श्री मूर्तीवर अभिषेक, ८.३० वाजता दत्त मंदिर, वायरी बांध येथून पालखी मिरवणूक, ११ वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सखी फुगडी संघ, पावशीचा फुगडी कार्यक्रम, ६ वाजता श्रींची पूजा, ७वाजता महाआरती, रात्री ८ वाजता गोविंद आसोलकर बुवा यांचे कीर्तन, ९.३० वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ, १० वाजता कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरुर यांचा पारंपरिक लोककलेचा मांड उत्सव सादर होणार आहे.

३ फेब्रुवारी  रोजी अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, हळदीकुंकू, ५ वाजता विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, खैदा कातवड यांचे भजन, ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजता महापुरुष महिला भजन मंडळ, तारकर्ली वरचीवाडीचे भजन, १० वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. २ रोजी पालखीचे दर्शन घेत येणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन राजेंद्र तारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!