*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण येथील प्राचार्य डॉ.आत्माराम देऊ कांबळे यांना “उत्कृष्ट प्राचार्य” पुरस्कार जाहीर*
*कणकवली : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या करियर कट्टा जिल्हास्तरीय स्पर्धा २०२४-२५ मध्ये प्राचार्य डॉ.आत्माराम देऊ कांबळे यांना “उत्कृष्ट प्राचार्य” स्पर्धेत द्वितीय क्रमांक जाहीर केले गेले.
करियर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक प्रा.व्हंकळी जी.पी.यांच्या नेतृत्वाखाली हा विभागाद्वारे महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची ही पोचपावती म्हणणे योग्य ठरेल.या अनुषंगाने प्राचार्य.डॉ.कांबळे ए.डी.यांचे शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची तळमळ आणि शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी केलेले मोलाचे योगदान यामुळे त्यांना हा बहुमान मिळाला आहे.करियर कट्टा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्राचार्य म्हणून डॉ. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना नव्या संधी शोधण्यासाठी प्रेरणा दिली व त्यांना योग्य दिशा मिळवून दिली.त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
हा पुरस्कार त्यांच्या अथक परिश्रमांची पावती असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेली मानदंड ठळकपणे अधोरेखित करतो. प्राचार्य डॉ. कांबळे यांचे यश महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांना आणि कर्मचारी वर्गासाठी प्रेरणादायी ठरले आहे.याबाबत आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.