*कोंकण एक्सप्रेस*
*राणे परिवाराच्या दातृत्वाने दोघांना नवसंजीवनी बहाल*
*ओसरगावच्या संगीता धोत्रे आणि हरकुळच्या पियुष सोहनी यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया*
*दोघांनीही राणे परिवाराचे मानले आभार*
*कणकवली : प्रतिनिधी*
माजी केंद्रीयमंत्री विद्यमान खासदार माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब व माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या प्रेरणेने,स्वाभिमान वैद्यकीय संस्थेचे श्री.जहीद खान व फाहमिदा मॅडम यांच्या सहकार्याने कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील श्रीमती संगीता चंद्रकांत धोत्रे यांचे मुंबई येथील KEM हॉस्पिटलमध्ये हृदयावर वॉल रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली.
तसेच कणकवली हरकुळ येथील पियूष सिताराम सोहनी वय वर्ष ९ या मुलाच्या डाव्या पायावरती मुंबई येथील लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.दरम्यान दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून राणे परिवाराच्या दातृत्वाने दोघांना नवसंजीवनी बहाल झाली आहे.याबद्दल या दोघांनीही माननीय नामदार राणे साहेब यांची कणकवली निवासस्थानी भेट घेऊन राणे परिवाराचे विशेष आभार मानले.