*कोंकण एक्सप्रेस*
*पाल ग्रामपंचायत येथील कदमवाडी येथे संविधान गौरव कार्यक्रम संपन्न*
*वेंगुर्ला :प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील पाल ग्रामपंचायत मधील कदमवाडी येथे संविधान गौरव कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच संविधानाचे पुजन करण्यात आले.यावेळी मान्यवर म्हणून गावचे सरपंच कावेरी कमलेश गावडे ,शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश विलास गावडे ,बुथप्रमुख प्रदीप चंद्रकांत मुळीक , ग्रामपंचायत सदस्या स्नेहल नंदू पालकर ,शाळेचे शिक्षक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.