*कोंकण एक्सप्रेस*
*साखरी नाटे जेटी च्या प्रक्रिये विरोधात मनसेचे उद्या प्रजासत्ताक दिनी पाण्यात उतरून आंदोलन*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
साखरी नाटे येथे सुरु असलेल्या मच्छिमार जेटीच्या बाबतीत जनसुनावनी वेळीच मनसे ने आक्षेप घेतला होता.सदर प्रकल्पचा पाचशे पानी अहवाल हा स्थानिक जनतेसाठी इंग्रजी मधून उपलब्ध करून देण्यात आला होता.आम्ही सगळे मच्छिमार इंग्रजी मधून आलेला अहवाल कसा काय वाचणार? येथे काय काय होतेय हे आम्हाला कसे काय कळणार? असे म्हणत येथील काही लोकांनी मनसेचे उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना संपर्क केला होता.त्यानंतर यामध्ये विस्तृत माहिती घेत मनसेने जनसुनावनी मध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले होते जसे की संपूर्ण कार्य अहवाल पहाता यामध्ये जेटी वर मच्छिमारा करिता विश्रांतीगृह स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहेत.
शीतगृह उपहारगृह इत्यादी देखील उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर मिरकरवाडा येथील जेटीवर यातील एकही गोष्ट उपलब्ध नाही मग येथे कसे काय करणार? खाडी पात्रात 8 फूट खोदकाम करून खोली निर्माण करणार.८ फूट खोदल्यावर येथील जैववैविधतेचे काय? जेटी साखरी नाटे मध्ये पण भराव धाऊलवल्ली मधून टाकत आहेत तर माशाच्या प्रजनन केंद्रेच नष्ट करत आहेत या व अशी अनेक प्रश्न ज्याची उत्तरे एकाही अधिकार्याला देता आली नाहीत. म्हणून मेरिटाइम बोर्डाला मनसेने निवेदन दिले होते की जो पर्यंत या सर्व प्रश्नाची समाधान कारक उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत काम बंद ठेवा.त्या वरती मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी कॅप्टन भुजबळ यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांना कार्यालय येथे बोलावून अपमानास्पद वागणूक दिली होती.
नाटे येथील प्रकल्प बाबतीतील इतिहास पहाता सौन्दळकर यांनी संयमाने भूमिका घेऊन भुजबळ याच्या उद्धटगिरीला व प्रशासनाच्या दुर्लक्षपनाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी खाडीच्या पाण्यात उतरून निषेध आंदोलन करून शासनाचे लक्ष आमच्या प्रश्ना कडे वेधून घेऊ व जो पर्यंत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी येऊन याबाबत सर्व प्रश्नाचे निरसन करत नाहीत व मुजोर कॅप्टन भुजबळ याला निलंबित अथवा बदली करत नाहीत.
तो पर्यंत पाण्यातून बाहेर येणार नसल्याचे व प्रशासनाला निवेदना पेक्षा आंदोलनाचीच भाषा कळत असल्याने हा मार्ग आम्ही निवडाला असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी कळविले आहे.