आस्था ग्रुप मालवण आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

आस्था ग्रुप मालवण आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*आस्था ग्रुप मालवण आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण वासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने धावण्याचा संदेश देणारी महत्त्वपूर्ण असलेली मालवण मॅरेथॉन स्पर्धा आस्था ग्रुपच्या वतीने सलगपणे आयोजित करण्यात येत आहे. आज शनिवारी सकाळी ७.०० वाजल्यापासून रंगलेल्या या स्पर्धेत सुमारे ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते सागरी महामार्ग या ठिकाणी झाले.पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात मुले मुलगी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.विजेत्यांना रोख रक्कम आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समस्त मालवणकर,पोलीस प्रशासन,शिक्षक वर्ग आणि आस्था ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!