वैभववाडीतील नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

वैभववाडीतील नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडीतील नाभिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

वैभववाडीतील नाभिक समाज संघटनेने पर राज्यातील कारागिराणा वैभववाडीत आणून सलून व्यवसाय करण्यास संघटनेचा तीव्र विरोध असल्या बाबतचे निवेदन वैभववाडी तहसीलदार यांना दिले आहे. असे झाल्यास तालुक्यातील सलून व्यावसायिकांना बेकारी व बेरोजगारीचा सामना करावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे.

तालुक्यातील नाभिक समाज हा पारंपारिक सलून व्यवसायात गुतलेला असून स्पर्धेच्या युगात रोजगार नोकरी ची संधी नसल्यामुळे तरुण होतकरु पिंढी ही पारंपारिक सलून व्यवसाय कडे वळली आहे याच व्यवसायावर त्यांचा उपजीविका व उदरनिर्वाहाचे साधन बनलेले आहे असे असताना संगणक संघटनेच्या बाहेरील इतर लोक परप्रांतीय कामगार आणून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्रातील नाभिक समाज वगळता काही इतर समाजातील लोक सलोनी व्यवसाय बोलून परराज्यातील परप्रांतीय कारागीर आणून व्यवसाय सुरु करत आहेत असा व्यवसाय करणाऱ्यांना नाभिक समाज संघटनेचा तीव्र विरोध आहे जिल्ह्यातील नाभिक समाजातील कारागिर ठेवून व्यवसाय करायला संघटनेचा कोणताच विरोध नाही परंतु परप्रांतीय कारागीर घेऊन इथल्या स्थानिक लोकांना रोजगारापासून वंचित ठेवल्यास अशामुळे तालुक्यातील सलून व्यवसायिकांवर बेरोजगारीची पाळी येईल. तरी या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन नाभिक बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!