*कोकण Express*
*विनामास्क फिरणाऱ्या २४४ जणांवर दंडात्मक कारवाई*
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात २४४ व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये पोलिसांनी २०७ व्यक्तींवर कारवाई करत एकूण ५8 हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये ३७ व्यक्ती या विनामास्क आढळून आल्याअसून त्यांच्याकडून एकूण ९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही ६८ हजार ६०० रुपये इतकी आहे.
त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण ७० ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅन्डसॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.