*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा*
*वैभववाडी तालुका शिवसेना उबाठाने नगरपंचायत सीईओ ना दिले निवेदन*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वैभववाडी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन नेहमीच नागरिकांची वर्दळ असते, वैभववाडी शहरातील लाखो रुपये खर्च करून नगरपंचायतीने जनतेच्या सुरक्षिततेसाठी बसविलेले सी.सी.टी. व्ही. कॅमेरे गेली वर्षभर बंद अवस्थेत धुळखात पडलेले आहेत. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रशासनाची व सत्ताधारी नगरसेवकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
अलिकडेच काही महिन्यापूवी एकाचवेळी ७ घरे चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरु असते तर चोरीला आळा बसला असता. शासनाकडून नगरपंचायतीला कोठ्यावधी रुपयांचा निधी दरवर्षी वितरित केला जातो. त्या निधीचा उपयोग अन्य कामाप्रमाणे प्राधान्याने सी.सी.टी. व्ही. कॅमेरे दुरुस्तीसाठी केला असता तर शहरात होणारे घरफोड्या व अन्य बेकायदेशीर घटना घडल्या नसत्या.
तरी शहरातील सी.सी.टी. व्ही. कॅमेरे तात्काळ दुरुस्ती करुन कार्यन्वित कराव्यात. अन्यथा शहरातील नागरिकांना घेऊन नगरपंचायत प्रशासनाला घेराव घालण्यात येईल असा इशारा शिवसेना उबाठाच्या वतीने देण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवा सेना सचिव स्वप्निल धुरी, जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप सरवणकर, महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकुडे, नगरसेवक मनोज (बंड्या) सावंत, लोरे विभाग प्रमुख सूर्यकांत परब, वैभववाडी महिला शहरप्रमुख मानसी सावंत, उपविभाग प्रमुखयशवंत गवाणकर, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, राजेश तावडे, उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे, युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, कोळपे सरपंच सुनील कांबळे, सोनाळी शाखाप्रमुख अनिल कदम, कोकिसरे शाखाप्रमुख अनंत नादल्सकर, दिलीप पवार, राजाराम गडकर आदी उपस्थित होते.