*कोंकण एक्सप्रेस*
*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दोडामार्ग तालुक्यात उत्साहात साजरी*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोडामार्ग तालुक्यात शिवसैनिकांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. मराठी माणसासाठी सातत्याने कार्य करणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
मराठी माणसासाठी सातत्याने कार्य करून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला.शिवसेना आणि मराठी माणूस हा एक विचार निर्माण झाला.शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्यात शिवसेना घडली. हा हा म्हणता शिवसेना आली व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील शिवसेनेचा झाला.नंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि मराठी माणूस हे एक समीकरण बनत गेलं.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे विचार जनमानसात पोहोचू लागले महाराष्ट्रा पुरता जरी या नेत्याने पक्ष स्थापन केला आणि तरी संपूर्ण हिंदुस्थानात एक वेगळी ओळख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली होती.त्याचमुळे आजही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे प्रत्येक मराठी माणसात शिवसेनेच्या हृदयात असल्या कारणाने बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आजही अस्तित्वात आहे.त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या वर्गाकडून दोडामार्ग तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.