*कोंकण एक्सप्रेस*
*संगमेश्वर देवळे जंगलवाडीत आढळला दुर्मिळ प्राणी ‘ शेकरु!*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी या गावातील घागरेवाडी येथे अती दुर्लभ असा या भागात कधीही न दिसणारा ‘शेकरु ‘ जातीचा प्राणी दिसला असुन या दुर्लभ प्राण्याला कॅमेराबद्ध केल आहे देवळे येथील महेंद्र चव्हाण यांनी.या धनेश निरिक्षक प्राणी मित्रानी जंगलवाडी गावातील घागरे वाडी येथिल प्रवीण जोयशी यांचे घराजवळ माडाच्या झाडावर शेकरू हा प्राणी प्रथमच दिसून आला असून या आधी हा प्राणी देवळे पंचक्रोशीत कधीही आढळला नव्हता.
पण वन्यप्राणी संवर्धन, वन संवर्धन, आणि पक्षी संवर्धनाचे काम करणाऱ्या सहयाद्री संकल्प सोसायटी देवरूख या संस्थेसाठी देवळे पंचक्रोशीत धनेश निरीक्षण आणि संवर्धनाचे काम करणारे महेंद्र चव्हाण हे मकर संक्रांतीच्या दिवशी धनेश निरिक्षणासाठी घागरेवाडी येथे गेले असता त्यांना सुरमाडाच्या झाडावर फळे खाताना ‘शेकरू ‘ हा प्राणी आढळून आला, मागील काही वर्षात गवे, पिसुरी हरीण, बिबट्या हे प्राणी या भागात दिसून येत आहेत आता शेकरुही दिसल्यामुळे पुढील काही वर्षात या भागात शेकरू या प्राण्याची संख्या वाढण्यासाठी या भागातील वृक्षतोड थांबवून वन संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत प्राणी मित्रांकडून व्यक्त केले जात आहे.

