*कोंकण एक्सप्रेस*
*शिरशिंगे सैनिक भवनाचे २६ जानेवारीला उद्घाटन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
शिरशिंगे येथे सैनिक भवन आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या सैनिक भवन इमारतीचे उद्घाटन २६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र मडगावकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष नारायण राऊळ, दीपक शिर्के आदींनी केले आहे.