*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी दिली श्री धुतपापेश्वर मंदिराला भेट*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या प्रयत्नांनी श्री धुतपापेश्वर मंदिर विकास आराखडा साठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री [सार्वजनिक उपक्रम] मा.ना.एकनाथ शिंदे ह्यांनी प्राचीन मंदिर वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत निधी मंजूर केला होता.राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी काही दिवसांपूर्वी असाच गावभेट कार्यक्रम अंतर्गत राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील श्री धुतपापेश्वर मंदिर मंदिराला भेट दिली होती.
चालू असलेल्या विकास कामांची पाहणी करत असताना ग्रामस्थांनी मंदिर सुशोभीकरण काममधील असलेल्या त्रुटी दाखवून दिले होत्या त्यानंतर तात्काळ राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व विकासक ह्यांची बैठक आयोजित करून ग्रामस्थांना मंदिर परिसरात सुशोभीकरण कामामध्ये पाहिजे असलेल्या बदल लक्षात आणून दिले होते.त्यानंतर आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी अचानक श्री धूतपापेश्वर मंदिराला भेट देऊन कामाची पाहणी केली.परंतु झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार काही कामामध्ये त्रुटी आढळून आल्या.
मग मात्र राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी तात्काळ रुद्र रूप धारण करून विकासकांना खडेबोल सुनावत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्त प्रमाणे तात्काळ कामाची पूर्तता करण्यात यावी अशा कडक शब्दात सूचना दिल्या.