*कोंकण एक्सप्रेस*
*मुणगे येथील रक्तदान शिबिरात ६२ दात्यांनी केले रक्तदान !*
*देवगड : प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती देवस्थान आणि डॉ.सुजित कदम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिरात ६२ दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी श्री देवी भगवती देवस्थानचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगडचे सचिव प्रकाश जाधव,श्री दत्तकृपा क्लिनिकचे डॉ. सुजित कदम, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण प्रसारक सिंधदुर्ग उपाध्यक्ष दयानंद तेली, कुलसुम अॅग्रो टेकचे सौरभ राणे, जामसंडेचे नगरसेवक तांबे, भगवती एज्यूकेशन सोसायटीचे व्यवस्थापक देवदत्त पुजारे, शिक्षक प्रसाद बागवे,सामाजिक कार्यकर्ते मनोज सावंत,भगवती देवस्थान कमिटीचे विश्वस्त अनिल धुवाळी, कृष्णा सावंत,आनंद घाडी,रामचंद्र मुणगेकर,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.