*कोंकण एक्सप्रेस*
*बांद्यात पालकमंत्री नितेश राणेंचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषी स्वागत*
*बांदा : प्रतिनिधी*
बांदा येथे सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितेश राणे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन जल्लोषी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,प्रदेश चिटणीस सुरेश गवस,राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले,अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीख खान,जिल्हा उपाध्यक्ष एम.डी.सावंत,ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, शहर अध्यक्ष विराज बांदेकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयडे, राष्ट्रवादी कुडाळ तालुकाध्यक्ष आर.के.सावंत,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीव, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, रोहण परब, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे जिल्हा सचिव विलास पावसकर, वेगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, तालुका उपाध्यक्ष मेघेन देसाई, दीपक देसाई, पप्पू जाधव व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.