*कोंकण एक्सप्रेस*
*विश्व हिंदू परिषद मातृशक्तिच्या वतीने सामूहिक हळदी-कुंकू समारंभ संपन्न*
*दोडामार्ग : शुभम गवस*
विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने रविवार दि. १९ जानेवारी रोजी महाराजा हॉल दोडामार्ग येथे सामूहिक हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या हळदी कुंकू समारंभात मातृशक्ति, जिल्हा संयोजिका सौ.वर्षा मडगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विश्व हिंदू परिषद च्या मातृशक्ती सहसंयोजिका सौ.चैताली भोळे,दोडामार्ग नगरपंचायत नगरसेविका सौ. संध्या प्रसादी, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख चेतना गडेकर,सौ. कविता गवस,सौ. रुचा धर्णे,यांसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.