*कोंकण एक्सप्रेस*
*लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाकडून
युवा पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आलेले पत्रकार प्रतिक राणे यांचा सत्कार……*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या युवा पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आलेले पत्रकार प्रतिक राणे यांचा लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाकडून सत्कार करण्यात आला.
प्रतिक राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा युवा पत्रकार पुरस्कार विधानसभा अध्यक्ष ॲड.श्री.राहुल नार्वेकर व माजी शिक्षणमंत्री आमदार श्री.दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला होता .
हळबे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक महोत्सवात युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. श्री. रमेश तिवारी (माजी अध्यक्ष, रोटरी क्लब पर्वरी, जिल्हा सचिव पी. एच. एस. सोसायटी आणि डायलेसीस युनिट), मा. श्री. सचिन केतकर (अॅडमिन एक्झिक्युटिव्ह, एव्हियेशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर, मोपा एअरपोर्ट, गोवा), मा. श्री. सुर्यकांत परमेकर (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मा. श्री. विवेकानंद नाईक (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मा. श्री. राजेंद्र केरकर (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मा. श्री. डॉ. हेमंत पेडणेकर (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मा. श्री. मनोज पार्सेकर (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना),प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, प्रा. डॉ. संजय खडपकर क्रीडा विभाग प्रमुख, प्रा.डॉ.पी.डी.गाथाडे सांस्कृतिक विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.