*कोंकण एक्सप्रेस *
*आय.टी.आय.मध्ये उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा*
*देवगड : प्रतिनिधी*
औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवगडमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय युवा दिन यानिमित्त उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी संस्थेचे प्राचार्य श्रीराम कुसगावकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.प्रमुख पाहुणे विजय बांदीवडेकर,अनिकेत भडसाळे आणि गिरीष दहीबावकर यांनी थोर महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व सांगुन नोकरी मागणार नाही,तर नोकरी देणारे,यशस्वी उद्योजक होण्याचा सल्ला दिला.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.