*कोंकण एक्सप्रेस*
*स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून १९ जानेवारीला नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिम*
*कणकवली : प्रतिनिधी*
स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून रविवार दिनांक १९ ला नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी ८ ते १० स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे.
यावेळी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील सरपंच अनुजा रावराणे, रविराज मोरजकर, प्रवीण पन्हाळकर, मनाली गुरव यांच्यासह बँक ऑफ बडोदा कणकवली चे शाखा व्यवस्थापक नितेश शेणाय जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी या मोहिमेत सहभागी होणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्रामस्थांनी सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन स्वच्छता मिशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.