रत्नागिरी जिल्ह्यात सरकारी कर्मचारीच बांगलादेशीय नागरिकांना सरकारी कागदपत्रे पुरवतात ?

रत्नागिरी जिल्ह्यात सरकारी कर्मचारीच बांगलादेशीय नागरिकांना सरकारी कागदपत्रे पुरवतात ?

*कोंकण एक्सप्रेस*

*रत्नागिरी जिल्ह्यात सरकारी कर्मचारीच बांगलादेशीय नागरिकांना सरकारी कागदपत्रे पुरवतात ?*

*सरकारी कागदपत्रे असणारी ही दुसरी घटना !!*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

काल ए टी एस मुंबई च्या पोलिसांनी पकडलेली ती महिला बांगलादेशातील ढाका येथे मूळची रहाणारी पण गेली 5वर्षांपासून रत्नागिरी शहरात रहात आहे.दरम्यान पोलिसांनी सलमा राहील बोंबल वय वर्षे ३० रा.चिरायू हॉस्पिटल च्या मागे सफा अपारमेंट व पती राहील बोंबल वय वर्षे ३३ मूळ चे सावर्डे चिपळूण यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बांगलादेशीय महिला ही पहिली गुहागर मधून रत्नागिरीत आल्याची माहिती मिळत असून त्या बांगलादेशी महिलेचा जन्म दाखला चिपळूण मधील एका सरकारी कार्यालयातून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान काल एटीएस मुंबई व रत्नागिरी शहर पोलिसांनी रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे राहणारी सलमा राहील बोंबल वय वर्ष ३० या महिलेला चिरायू हॉस्पिटलच्या पाठी मागे असलेल्या सफा अपार्टमेंट मधून ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे

दरम्यान तिचा नवरा राहील बोंबल वय वर्ष ३३ हा मिरकर वाड्यामध्ये मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचेही पुढे आले आहे.दरम्यान काल एटीएस च्या पोलिसांनी दोघांना ही ताब्यात घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.रत्नागिरी शहरात गेली पाच वर्ष राहत असलेली सलमा कडे आधार कार्ड, पॅन कार्ड व जन्मदाखलाही मिळाल्याने आता सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड जन्म दाखले देत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची ही चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते.

ताब्यात घेण्यात आलेली सलमा राहील बोंबल ही मूळची ढाका येथील असून ती पहिल्यांदा गुहागर येथे आली आणि गुहागर मधून ती रत्नागिरी झाल्याचे समजते दरम्यान गुहागर मध्ये ती कशी आली कोणाकडे होती किंवा गुहागर मध्ये तिचे काही नातेवाईक आहेत का ? याचा ही तपास पोलीस करत आहेत.दरम्यान तिचा पती राहील बोंबल मूळचा सावर्डे येथे राहणारा असलेला हा रत्नागिरी मध्ये गेली पाच वर्षापासून मिरकर वाडा येथे मच्छी विक्रीचा दुकान टाकून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे.एटीएस मुंबईचे उपपोलीस निरीक्षक विनय नरवणे अंमलदार स्वप्निल तळेकर तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत.
दरम्यान आज दोघां ही पती-पत्नींना न्यायालयाच्या पुढे हजर केले जाणार असल्याचेही समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!