वेंगुर्ले येथे २८ ते ३० जानेवारीला मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन

वेंगुर्ले येथे २८ ते ३० जानेवारीला मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले येथे २८ ते ३० जानेवारीला मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.श्रीपाद पाटील यांच्या सूचनेनुसार व सिंधुदुर्गचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ते ३० जानेवारी रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये भिषक, शल्य चिकीत्सक, बालरोगतज्ज्ञ, प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ, नाक, कान व घसातज्ज्ञ व दंत चिकीत्सकांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. २८ रोजी रुग्णांची तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असून २९ रोजी तपासणीअंती निवडलेल्या शस्त्रक्रियेस पात्र रुग्णांना शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!