*कोंकण एक्सप्रेस*
*कोकणचे नैसर्गिक सौंदर्य जपून शाश्वत विकास करण्याचा मानस -राहुल नार्वेकर*
*चिपी सारखी विमानतळे बंद पडू नये यासाठी लवकरच भूमिका ठरणार*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
कोकणचे नैसर्गिक सौंदर्य न घालवता येथील पर्यटन व नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.यापुढे मी कोकणात अधिकचा लक्ष घालीन, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.दरम्यान चिपी सारखी छोटी विमानतळे बंद पडू नये यासाठी राज्यातील सर्व विमानतळावर कायमस्वरूपी विमान सेवा चालविली जावी,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केली आहे,असे ही ते म्हणाले.श्री.नार्वेकर यांनी आज मातोंड येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व मातोंड गावच्या वतीने दादा परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. भोसले म्हणाले, अध्यक्ष नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सत्ता बदलाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशा नुसार जो महत्वपूर्ण निर्णय दिला त्याची नोंद इतिहासात राहील. व यापुढे ज्या प्रमाणे मागील शिंदे सरकार स्थापन झाले व पुन्हा देशात इतर कोणत्याही राज्यात असे सरकार आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्या वेळेला राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय सर्व राजकीय पक्षांना एक इशारा वजा दिशा देणारा निर्णय आहे व दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी प्रशांत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, देवस्थानचे मानकरी उदय परब, रविकिरण परब, सुधाकर परब, तुकाराम परब, दिगंबर परब, सुनील परब, दादा म्हालटकर, डॉ. कांडरकर, पोलीस पाटील सागर परब आदी उपस्थित होते.