*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार आबा खवणेकर यांची फेरनिवड*
*उपाध्यक्ष पदी समिल जळवी,उपाध्यक्ष पदी शिरीष नाईक,सचिव पदी कृष्णा सावंत,खजिनदार पदी संजना हळदिवे,सहसचिव पदी सलिल पालव यांची निवड*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात घेण्यात आली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.तसेच या संघटनेचे पूर्वी कार्यरत असलेले मिलिंद धुरी,आनंद कांडरकर,विष्णू धावडे,प्रमोद गवस यांना या पत्रकार संघातून काढण्यात यावे,अशी सर्वानुमते मागणी केल्याने त्यांना या पत्रकार संघातून कमी करण्यात आले.
तर या कार्यकारिणीत नवीन सदस्य म्हणून मीनानाथ वारंग,स्वरूपा सौदागर,विष्णू चव्हाण,लिना नरसुले,योगिता कानडे,संजय हळदिवे,अमिता मठकर यांची यावेळी निवड करण्यात आली.तर समिल जळवी यांनी सर्वाचे आभार मानले.