दोडामार्ग पोलीस व महसूल यंत्रणेला ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी धारेवर धरले

दोडामार्ग पोलीस व महसूल यंत्रणेला ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी धारेवर धरले

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग पोलीस व महसूल यंत्रणेला ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी धारेवर धरले*

*स्व.प्रसाद कांबळे याच्या अपघाती मृत्यु प्रकरणी पोलिसांची गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

आज दोडामार्ग मध्ये स्व. प्रसाद कांबळे या युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी दोडामार्ग मधील सर्वपक्षीय तसेच ग्रामस्थ एकत्र जमले,त्यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करून कोणत्याही परिस्थितीत प्रसाद याला न्याय मिळालाच पाहिजे तसेच चालकासह मालकावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे याची मागणी केली.

यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव तसेच सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, रामदास कांबळे, गणपत कांबळे, गणेशप्रसाद गवस, सरपंच संजना धुमास्कर यांसह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. पोलीस यंत्रणा तसेच महसूल यंत्रणा नक्की काय करते यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करताना तहसीलदार यांना तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहात त्यामुळे या गोष्टीवर तुमचे नियंत्रण असले पाहिजे असे म्हणत पोलीस नेमके करता तरी काय ?, “चोर सोडून कायमच सन्याशाला फाशी देतात” त्यामुळेच या ठिकाणी अराजकता माजली असून याचा त्रास सर्व सामान्य जनतेला होत आहे, सध्या खडी तसेच इतर अवैध वाहतूक सुरू आहे त्याचा त्रास येथील नागरिकांना होतो आहे, त्यामुळे प्रसाद कांबळे याचा मृत्यू झालेला असून याला सर्वस्वी वाहन चालक तसेच मालक जबाबदार आहेत. मालक याने त्या ठिकाणी मुजोरी करून खडी भरलेला ट्रक रिकामी करायला लावला तसेच अपघातग्रस्त प्रसाद याला कोणतीही मदत केली नाही तसेच तो अनुसूचित जातीचा होता म्हणूनच हे सर्व केलं त्यामुळे त्याच्यावरती ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!