*कोंकण एक्सप्रेस*
*उसपतिठा येथे कारची स्कूटरला धडक : महिलेसह मुलगा जखमी*
*दोडामार्ग : शुभम गवस *
साटेली भेडशी उसपतिठा येथे गोवा येथे जाणाऱ्या पर्यटक यांच्या कारने पुढे जाणाऱ्या स्कुटरला मागून धडक दिली.ही घटना सायंकाळी ५:०० च्या सुमारास घडली.वाळपई गोवा येथील महिला खाली पडून जखमी झाली.तिला तातडीने साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले.पण यावेळी रुग्णवाहिका नसल्याने दोडामार्ग पोलिसांनी आपल्या गाडीत घालून गोवा हद्द रुग्णवाहिका पर्यंत नेले .
वाळपई गोवा येथील एक महिला,पती आणि मुलगा हे बोडदे येथे नातेवाईकांच्या घरी आले होते.ते पुन्हा घरी जाण्यासाठी दोडामार्ग ते तिलारी मुख्य रस्त्यावर आपल्या स्कुटरने जात असताना कोल्हापूर जोतिबा देवदर्शन करून गोवा येथे निघालेल्या पर्यटक यांच्या कारची पुढे चालत असलेल्या स्कुटरला मागून धडक दिली. या धडकेने महिला खाली पडली लगेच तिला कार मधून साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले.या अपघातात महिलेच्या मुलालाही किरकोळ दुखापत ही झालेली आहे.