*कोंकण एक्सप्रेस*
*भाजी विक्रेता शिवा नायक खून प्रकरणी फरारी तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने आवळल्या मुसक्या*
*कुडाळ :प्रतिनिधी*
कुडाळ शहरातील भाजीविक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील सुनंदा नायक हिचा प्रियकर सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण,आदिक चव्हाण हे फरारी होते.या तिघांना पोलीस शोधत असताना गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या ठिकाणी असल्याचे समजले.त्या ठिकाणी जाऊन या तिघांनाही स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आणि कुडाळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक सुधीर सावंत पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिष गंगावणे,सदानंद राणे,प्रमोद काळशेकर,अमित तेली व पोलीस हवालदार व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.