सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

*कोंकण एक्सप्रेस*

*सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात*

*मुंबई : प्रतिनिधी*

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.चाकूने त्याच्यावर ६ वार करण्यात आले होते.त्यातील २ वार अत्यंत खोलवर असल्याची माहिती मिळत आहे.पोलीस तपास करत असताना त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज आलं आहे.त्यात हल्लेखोराचा चेहरा दिसत असून,तो पायऱ्यांचा वापर करून पळ काढण्याचा प्रयत्नात दिसत आहे.संशयित हल्लेखोराचा फोटो सीसीटीव्ही फुटेजवरून घेण्यात आला असून,या फोटोच्या आधारे पोलीसानी हल्लेखोराला तब्यात घेतले आहे.

सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले होते.दरम्यान घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या ८ टीम स्थापना करण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांच्या ७ टीम तयार करण्यात आल्या.सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण १५ टीमकडून तपास करण्यात येत आहे.आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे.त्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर पायऱ्यांचा वापर केला.घरातून पळून जाताना सैफवर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला.त्यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना ६ व्या मजल्यावर दिसला.या फोटोवर २  वाजून ३३ मिनिटांची वेळ दिसत आहे.

पोलिस सूत्रांच्या माहिती प्रमाणे,ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो.ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत.पोलिसांचा असा विश्वास आहे की,अशा प्रकारच्या घटना केवळ सराईत आरोपीच करू शकतात.आरोपी प्रभादेवी परिसरात लपला होता.पोलिसांना त्याच लोकेशन सापडलं.त्यावरून पोलिसाने त्याला तब्यात घेतल असून अधिक तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!