कोंकण एक्सप्रेस
आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात पुस्तक परीक्षण स्पर्धा..
दोडामार्ग/ता१५/ : शुभम गवस.
.
आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात वाचन पंधरवडा उपक्रम साजरा पुस्तक परीक्षण स्पर्धा उत्साहात.
आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग मध्ये ‘वाचन : संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला , या स्पर्धेत सीमंतिनी नाईक – प्रथम , साईशा देसाई- द्वितीय तर मयूर तर्फे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून प्रा. एन.एम. चौगुले व प्रा. एस. आर. नाईक होते.
महाविद्यालयात वाचन पंधरवडा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी वाचन, कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण व्याख्यान इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले होते.
आजच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे घरातील पुस्तकांची जागा आज हातातील मोबाईल होणे घेतलेली आहे या तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ वाचन: संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम हाती घेतला होता दिनांक 1 ते 15 जानेवारी हा वाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयांतर्गत झालेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हा उपक्रम राबवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य गोळसे व संस्था यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले.